-
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेते मंदार चांदवडकर हे ‘आत्माराम तुकाराम भिडे’ ही भूमिका साकारत आहेत.
-
मालिकेत ते एका शिस्तप्रिय शिक्षकाच्या भूमिकेत दिसतात. शिक्षकासोबतच ते गोकुळधाम सोसायटीचे ‘एकमेव सेक्रेटरी’देखील आहेत.
-
नुकतीच मंदार चांदवडकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला एक विशेष मुलाखत दिली.
-
त्यांच्या या भूमिका आणि संवादांना प्रेक्षकांनी अनेक वर्षांपासून डोक्यावर घेतले आहे.
-
या मुलाखतीदरम्यान त्यांना, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने मंदार चांदवडकर यांना नक्की काय दिले, असा प्रश्न विचारण्यात आला.
-
या प्रश्नावर अभिनेते मंदार चांदवडकर म्हणाले की, या मालिकेने मला प्रचंड प्रेम आणि प्रचंड आदर दिला.
-
तसेच प्रेक्षकांचे प्रचंड आशीर्वाद आणि पैसाही दिला, असे त्यांनी सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य: मंदार चांदवडकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत