-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि लाडकी जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे.
-
सध्या सोशल मीडियावर या क्युट जोडीच्या एका नवीन फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
या व्हायरल फोटोमध्ये अमृता आणि प्रसाद यांची केमिस्ट्री अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.
-
या जोडीने सध्या अधिक मासात सुरू असलेल्या धोंडे जेवणाच्या खास बेतासाठी हा अप्रतिम लूक परिधान केला होता.
-
या पारंपरिक आणि घरगुती सणाच्या निमित्ताने दोघांनीही पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सुंदर ‘ट्विनिंग’ केले आहे.
-
अमृताने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड वनपीस घातला आहे; तर प्रसादनेही अगदी तसाच मॅचिंग शर्ट परिधान केला आहे.
-
या दोघांचा हा मॅचिंग आणि एकत्र ट्विनिंग केलेला लूक चाहत्यांना प्रचंड आवडला असून, त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
दरम्यान, अभिनेता प्रसाद जवादे सध्या दीप ज्योती या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?