-
शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील.
-
दरम्यान, तोपर्यंत शनीचे अनेकवेळा नक्षत्र गोचरही होईल. यंदा २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन साजरे केले जाईल.
-
त्यापूर्वी ०२ जुलै २०२६ रोजी शनीदेवाचा रेवती नक्षत्राच्या द्वितीय पदामध्ये प्रवेश होईल व त्यानंतर शनीदेव २० ऑगस्ट २०२६ रोजी रेवती नक्षत्राच्या प्रथममध्ये गोचर करेल. शनीदेवाचे हे गोचर नक्कीच काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचे गोचर लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे हे गोचर खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.
-
हा योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल.
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे गोचर खूप खास असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…