-
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Adhik Maas Photos:मराठी संगीत विश्वातील लाडकं जोडपं मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सध्या त्यांच्या एका खास कौटुंबिक सोहळ्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
-
‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ फेम लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या पहिल्या अधिक मासातील जावई वाणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातील हा पहिलाच अधिक मास असल्याने मुग्धाच्या माहेरी जावई वाणाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
लग्नानंतरच्या पहिल्या अधिक मासानिमित्त मुग्धाच्या घरी प्रथमेशचा खास पारंपरिक पद्धतीने पाहुणचार करण्यात आला.
-
मुग्धाने या सुंदर आणि पारंपरिक सोहळ्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
‘आमचा पहिला पुरुषोत्तम मास!’ असे कॅप्शन मुग्धाने या फोटोंना दिले आहे.
-
ज्यामध्ये प्रथमेशचा साग्रसंगीत पाहुणचार आणि त्याला दिलेले जावई वाण पाहायला मिळत आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो- मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा