-
आपल्या वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो.
-
मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा आज ‘फादर्स डे’निमित्त आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्री जिनिलीया देशमुखने ‘फादर्स डे’निमित्त खास फोटो शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाने रितेश देशमुखचे मुलांबरोबरचे Unseen फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील ३ खास व्यक्तींचा उल्लेख केला आहे. ते तीन जण म्हणजे, पती रितेश देशमुख, तिचे बाबा नील डिसूजा आणि सासरेबुवा विलासराव देशमुख.
-
रितेश-जिनिलीयाची लग्नाआधी जवळपास १० वर्षे खूप छान मैत्री होती. त्यामुळे तिचं रितेशच्या घरी येणं-जाणं असायचं. जिनिलीयाला विलासराव देशमुख हे आपल्या सुनेपेक्षा जास्त आपली मुलगी मानायचे. म्हणूनच आज ‘फादर्स डे’निमित्त जिनिलीयाने विलासराव देशमुख यांच्याबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे. हा रितेश-जिनिलीयाच्या लग्नातील फोटो आहे.
-
याशिवाय जिनिलीयाने तिचे बाबा नील डिसूजांबरोबरचा एक गोड फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
“बाबा कसे असावेत? याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या आयुष्यातले हे तीन जण ( नवरा, बाबा अन् सासरे ). सर्वांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा! रितेश…आमचं ( माझं आणि आपल्या दोन्ही मुलांचं ) तुझ्यावर खूप-खूप प्रेम आहे.” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोंना दिलं आहे.
-
रितेश आणि त्याच्या दोन्ही मुलांमध्ये किती सुंदर बॉण्डिंग आहे हे फोटो पाहून स्पष्ट होत आहे.
-
जिनिलीयाने शेअर केलेला हा फोटो ‘वेड’ चित्रपटाच्या सेटवरचा शूटिंगदरम्यानचा आहे.
-
रियान व राहील ही रितेशच्या दोन्ही मुलांची नावं आहे. नुकतेच हे दोघंही ‘राजा शिवाजी’ चित्रपटात झळकले होते. या दोघांच्या अभिनयाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. ( सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम )
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ