-
आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना ऊर्मिला कोठारे तिच्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
या खास दिनानिमित्त ऊर्मिलाने सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये ऊर्मिला एका घनदाट जंगलातील नदीच्या प्रवाहात, दगडावर उभी राहून शांत चित्ताने वृक्षासन करताना दिसत आहे.
-
या फोटोमधील तिची ही निसर्गाच्या सान्निध्यातील योगसाधना चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.
-
हा सुंदर फोटो पोस्ट करत तिने ‘Yoga has always been a reminder to slow down, breathe, and reconnect with myself amidst life’s beautiful chaos. Wishing everyone a peaceful and mindful International Yoga Day,’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या अप्रतिम फोटोवर आणि योग दिनाच्या खास संदेशावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्मिला कोठारे/इन्स्टाग्राम)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या