-
मराठी मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार मूळचे कोकणातले आहेत. शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाल्यावर हे कलाकार आवर्जून गावी पोहोचतात.
-
‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अर्णव म्हणजेच लोकप्रिय अभिनेता अभिजीत आमकर सुद्धा नुकताच त्याच्या गावी पोहोचला आहे.
-
अभिजीत आमकरचं गाव रायगड जिल्ह्यात आहे. गावचे सुंदर फोटो शेअर करत त्याने लोकेशनमध्ये गावाचं नाव ‘शिवथर घळ’ असं लिहिलं आहे.
-
‘शिवथर घळ’ हे रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये, महाडपासून सुमारे ३४ किमी अंतरावर वरंध घाटाजवळ हे ठिकाण वसलेलं आहे.
-
“सह्याद्रीतून जाणारा हा रस्ता मला अशा माणसांकडे घेऊन जातो, ज्यांच्यामुळे माझं बालपण सुखात गेलं” असं कॅप्शन अभिजीतने या फोटोंना दिलं आहे.
-
अभिजीत पुढे म्हणतो, “आजी-आजोबांच्या तोंडून “आला का रे?” हे शब्द ऐकण्याची ओढ खूप दिवसांपासून मनात होती…एक अनपेक्षित सुट्टी, कार ड्राइव्ह, पावसाने भरलेलं आकाश आणि आनंदाने भरलेलं मन!”
-
सह्याद्रीच्या डोंगररांगा, कौलारू घर, गावचं मंदिर या सगळ्याची झलक अभिजीतने शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळतेय.
-
अभिजीतने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुझं गाव खरंच खूप सुंदर आहे”, “सह्याद्री म्हणजे खरा निसर्ग”, अशा प्रतिक्रिया हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
-
दरम्यान, अभिजीतने आजवर अनेक मराठी सिनेमे तसेच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. पण, ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेमुळे अभिजीतला घराघरांत एक नवीन ओळख मिळाली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अभिजीत आमकर इन्स्टाग्राम )
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय