-
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी अंशुला कपूरच्या (Anshula Kapoor) लग्नाच्या विधींना तिचा होणारा पती रोहन ठक्करबरोबर (Rohan Thakkar) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
-
अंशुलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘माता की चौकी’ या विधीचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या मंगलमय प्रसंगी कपूर कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते.
-
सोमवारी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि शनाया कपूर पारंपरिक पोशाखात अतिशय देखणे दिसत होते.
-
या खास विधीसाठी अंशुलाने सोनेरी रंगाचा लेहेंगा आणि सोन्याचे दागिने परिधान केले होते.
-
अंशुलाने पंजाबी परंपरेची ओळख असलेला सुंदर ‘फुलकारी’ दुपट्टा ओढला होता.
-
अंशुलाने सांगितले की, पंजाबी लग्नात फुलकारी दुपट्ट्याला खूप महत्त्व असते; जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारशाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंशुला कपूर/इन्स्टाग्राम)
Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, “जर ‘pawpaw’नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…”