-
Anushka Sarkate Nikhil Chavan Engagement: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांचा नुकताच दिमाखात साखरपुडा पार पडला.
-
अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
हे फोटो शेअर करताना अनुष्काने, “नव्या आयुष्याची सुरवात नव्या गाडीने करतोय.. तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असुद्या” असे छान कॅप्शन दिले आहे.
-
या खास सोहळ्यासाठी अनुष्काने हिरव्या रंगाची पारंपरिक सिल्क साडी नेसली होती.
-
निखिलने साखरपुड्यासाठी राखाडी रंगाचा कोट आणि काळी पॅन्ट असा फॉर्मल लूक केला होता.
-
अनुष्का आणि निखिलच्या या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अनुष्का आणि निखिल यांनी झी मराठीवरील ‘कारभारी लयभारी’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले होते.
-
याच मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सरकटे/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा