-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ने (Tharala Tar Mag TV Serial) केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
गेली तीन वर्षे ही मालिका देशात आणि परदेशातही तितक्याच आवडीने पाहिली जात आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी (सायली) तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच जुईने (Jui Gadkari) सोशल मीडियावर तिच्या वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) विशेष भागातील खास लूकचे फोटो शेअर केले आहेत.
-
या मालिकेतील वटपौर्णिमेच्या भागासाठी जुईने परिधान केलेली गुलाबी रंगाची सिल्क साडी आणि तिची पारंपरिक नथ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ‘वटसावित्री व्रत’ श्रद्धेने पाळले जाते.
-
यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सुख-समृद्धी मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा