-
घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता सुमित पुसावळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे.
-
सुमितची पत्नी मोनिका पुसावळे हिचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्ताने सुमितने सोशल मीडियावर गोड फोटो पोस्ट केले आहेत.
-
सुमितने पोस्टमध्ये लिहिले, “Dear बायको, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! I know गेले काही दिवस (खूप दिवस ) आपण तस काही जास्त बोलणच झालं नाहीये. मी शूटिंग ला जातोय, तू ऑफिस ला जातेयस दोघेही आपापल्या कामात बिझी होतो म्हणून म्हणलं आज थोडं बोलूयात तुझ्याशीच तुझ्याबद्दल. तर प्रिय बायको सगळ्यांना असं वाटतं की, मी किती बिझी आहे, सतत शूटिंग, मी खूप काम करतोय; पण खरं तर माझ्या दुप्पट काम करतेयस तू. तुला तुझं ऑफिस, आपलं काम, दिवस दिवसभर प्रवास या सगळ्यांचा मेळ घालायचा असतो आणि ते तू उत्तमपणे करतेस. ”
-
तो पुढे लिहितो, “मला success मिळावं, मला best मिळावं यासाठी तुझे कष्ट, तुझं नि:स्वार्थी प्रेम किती मोठं आहे हे मला माहितेय. कधी कधी वाटतं, मी तुला पुरेसं ‘धन्यवाद’सुद्धा म्हणत नाही. कारण- शब्द कमी पडतात. तू माझ्यासाठी जे करतेस, त्याची किंमत कोणत्याच शब्दांत मोजता येणार नाही. आता जे लिहितोय, ते कुठेतरी वाचलं होतं मी ‘If life repeats thousands time, I will still choose you again and again’ देवानं मला आयुष्यात खूप काही दिलंय; पण त्यातली सर्वांत सुंदर भेट म्हणजे तू आहेस बायको.”
-
कॅप्शनच्या शेवटी तो लिहितो, “कदाचित मी नेहमी बोलून दाखवत नाही; पण तुझी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट माझ्या लक्षात असते. तू बनवलेलं जेवण, आपल्या घरासाठी अन् घरच्यांसाठी केलेली धडपड, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्यासाठी केलेली धडपड हेच आपल्या नात्याला आणखीन घट्ट बनवतं. आज एवढंच म्हणेन की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको! माझ्या आयुष्यात येऊन तू प्रत्येक दिवस सुंदर केलास. तुझं प्रेम, साथ आणि काळजी यांसाठी मी कायम ऋणी आहे. देव तुला उत्तम आरोग्य, आनंद आणि यश देवो. Happy Birthday, My Love! तुझाच सुमित.”
-
सुमितची ही रोमँटिक आणि तितकीच भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सध्या मोनिकावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.
-
दोघांच्या या गोड फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुमीत पुसावळे/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम