-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सोशल मीडियावर भलताच चर्चेत आहे.
-
शिवने नुकतेच त्याच्या लाडक्या आजीसोबत एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, तर त्याच्या आजीने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे.
-
शिवने या फोटोंना, “तन्ने मैं लिखूं रानी दिल की.. या तन्ने मुमताज़ लिखूंगा.. जे लिखने में बैठ गया तन्ने.. तो पक्का मैं किताब लिखूंगा..” असे छान कॅप्शन दिले आहे.
-
शिवच्या या फोटोंवर चाहत्यांनी ‘खूप छान’, ‘मस्त’, ‘किती गोड जोडी’ अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
शिवने आजवर अनेक रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
-
आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि निरागस हास्यामुळे शिवने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या