-
झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ (Unch Majha Zoka TV Serial) ही अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ऐतिहासिक मालिका होती.
-
समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर ही मालिका आधारित होती.
-
या मालिकेत बालकलाकार म्हणून अभिनेत्री तेजश्री वालावलकरने (Tejashree Walavalkar) रमाबाई रानडे यांची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती.
-
याच तेजश्रीने नुकतेच पारंपरिक नऊवारी साडीत एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने लाल रंगाची देखणी पैठणी नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
पैठणी नऊवारी साडीतील या पारंपरिक लूकवर तेजश्रीने घातलेले सुंदर दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
या फोटोंना तेजश्रीने ‘क्षणोक्षणी भरारी घेणारा उंच माझा झोका…’ असे खास कॅप्शनही दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री वालावलकर/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत