-
झी मराठी वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका ‘लागीर झालं जी’मधील (Lagira Zala Ji) मुख्य अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि या मालिकेची निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांनी नुकतेच शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
-
महाराष्ट्राच्या शूरवीरांना आणि त्यांच्या शौर्याला मानवंदना देणाऱ्या ‘लागीर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ झाला.
-
या मालिकेतील शिवानीने साकारलेली ‘शितल’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
-
शिर्डी दौऱ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिवानीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
शिवानी म्हणाली, “साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे दिव्य आशीर्वाद मिळाल्याबद्दल मी स्वतःला अत्यंत धन्य आणि कृतज्ञ समजते.”
-
काही महिन्यांपूर्वीच शिवानीच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘साधी माणसं’ या मालिकेने ६०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
मालिका संपल्यानंतर शिवानीने घेतलेल्या या आध्यात्मिक भेटीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)
“मी काँग्रेसचे आभार मानते…”, सुनेत्रा पवारांच्या ‘गुंगी गुडिया’च्या टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया