-
हेमा मालिनी यांचे मुंबईतील घर आतून कसे दिसते, जाणून घ्यायचंय का? अलीकडेच, त्यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलने या घराची सफर घडवून आणली. ही ५४ वर्षे जुनी मालमत्ता आहे. या घराचं नाव ‘अद्वितीय’ आहे. ‘कर्ली टेल्स’शी बोलताना ईशाने खुलासा केला की, अनेक वर्षे या बंगल्याला कोणतेही नाव नव्हते. पुढे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी या घरासाठी ‘अद्वितीय’ हे नाव सुचवले.
-
हे घर लक्झरी व जुन्या आठवणींचे एक सुंदर मिश्रण आहे. घराच्या प्रवेशद्वारावर ‘अद्वितीय’ नावाची एक आकर्षक नेमप्लेट लावण्यात आली आहे. तर घराच्या आतल्या भागात हलके-सौम्य रंग, संगमरवरी फरशी, आरशांच्या भिंती आणि सुंदर झुंबरं पाहायला मिळतात.
-
मोठ्या खिडक्यांमुळे हॉल आणि किचनमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो. क्रीम रंगाचे सोफे, गादीच्या आरामखुर्च्या आणि सुंदर सजावट यामुळे हे घर पाहून मन प्रसन्न होतं.
-
या घरात एक प्रशस्त रिहर्सल हॉल आहे. उत्तम पॉलिश केलेले लाकडी फ्लोरिंग असलेल्या या हॉलमध्ये हेमा मालिनी यांच्या शास्त्रीय नृत्याचे सराव करतात. नृत्याबद्दल या कुटुंबाला असलेला आदर केवळ सरावापुरता मर्यादित नाही. ईशाने सांगितलं की, कलेचा आदर राखण्यासाठी या डान्स हॉलमध्ये चप्पल किंवा बूट घालून जाण्यास सक्त मनाई आहे.
-
या घरात हेमा मालिनी यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास दर्शवणाऱ्या आठवणींच्या वस्तू, चित्रे आणि दुर्मिळ छायाचित्रांनी सजलेली एक खोली आहे.
-
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे फोटो असलेल्या दोन खास उश्या या घरात आहेत. ही त्या दोघांची ठरलेली बसायची जागा होती, असं ईशा देओल गमतीत म्हणाली.
-
हेमा मालिनी पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यामुळे, त्यांचे किचन आणि शेफ पूर्णपणे वेगळे आहेत. जेव्हा मांसाहार करणारे पाहुणे किंवा नातेवाईक घरी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी वेगळ्या स्वयंपाकघरात आणि वेगळे कर्मचारी जेवण बनवतात.
-
या बंगल्याचा इतिहासही रंजक आहे. हेमा मालिनी यांनी एकदा सांगितलं होतं की ‘सीता और गीता’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९७२ मध्ये त्यांनी हे घर खरेदी केलं होतं. एका गुजराती कुटुंबाच्या मालकीचं हे घर घेतल्यावर त्यांनी त्याचं नूतनीकरण केलं आणि आता ते बहुमजली निवासस्थान आहे.
-
(सर्व फोटो- कर्ली टेल्स युट्यूबवरून स्क्रीनशॉट्स)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय