-
‘चला हवा येऊ द्या’फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या तिच्या एका नवीन सोशल मीडिया पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
-
श्रेयाने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या नव्या पोस्टमध्ये श्रेया मराठी इंडस्ट्रीतील क्युट जोडपं सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्यासोबत दिसत आहे.
-
हे तिघेही एका कॅफेमध्ये एकत्र निवांत वेळ घालवत फिरताना आणि धमाल करताना दिसत आहेत.
-
कॅफेमध्ये एकत्र बसून हे तिघेही वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा मस्त आस्वाद घेताना फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
-
यावेळी श्रेयाने परिधान केलेल्या स्टायलिश डेनिम टॉप आणि जीन्स गाऊनमधील तिचा लूक कमालीचा ग्लॅमरस वाटत आहे.
-
श्रेयाने कॅप्शनमध्ये ‘मीच ते कारण आहे, ज्यामुळे ती Date उरत नाही!!! Proof की मी त्यांची सर्वात फेवरेट Third Wheel आहे!!!!’ असल्याचे म्हटले आहे.
-
दुपारच्या जेवणात माझ्या ‘थ्री ॲक्ट प्ले’नंतरही ते दोघे माझ्यावर खूप प्रेम करतात असे मजेशीर कॅप्शन श्रेयाने दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक