-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
ती तिचे ग्लॅमरस आणि पारंपारिक फोटो शेअर करून सतत चाहत्यांची मने जिंकत असते.
-
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवीन पारंपारिक फोटो शेअर केले आहेत, जे सध्या खूप चर्चेत आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रुती अतिशय सुंदर अशा पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसत आहे.
-
तिने ही पिवळी साडी नक्षीदार काम केलेल्या आकर्षक गुलाबी रंगाच्या ब्लाउजसोबत परिधान केली आहे.
-
आपला हा लूक पूर्ण करण्यासाठी श्रुतीने मोत्यांचे आणि कुंदनचे सुंदर दागिने घातले आहेत.
-
या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिले आहे, ‘थोडीशी हळदीची ऊब… थोडासा गुलाबी गोडवा.’
-
श्रुतीच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मित्रमंडळी कमेंट्स करत तिच्या सौंदर्याची भरभरून स्तुती करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा