-
Nikhil Chavan Anushka Sarkate Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी नुकतीच आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
-
२४ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या जोडप्याचा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.
-
या लग्नसोहळ्यातील काही खास क्षणचित्रे अभिनेत्री शिवानी बावकरने (Shivani Baokar) सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
-
शिवानी आणि निखिल यांच्यात बहीण-भावाचे घट्ट नाते असून, या लग्नात तिने ‘करवली’ची भूमिका चोख बजावली.
-
आपल्या लाडक्या भावाच्या लग्नासाठी ती दोन दिवस आधीच लग्नघरी पोहोचली होती.
-
शिवानीने या नवविवाहित जोडप्याला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिवानी आणि निखिल यांनी झी मराठीवरील कमालीच्या गाजलेल्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ