-
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) यांनी अखेर आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
-
२४ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या दोघांचा शुभविवाह अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.
-
लग्नानंतर या नवदाम्पत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या (Tuljapur) श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी लीन होत दर्शन घेतले.
-
कुलदेवतेच्या दर्शनाबरोबरच त्यांच्या लग्नानंतरचा पारंपरिक ‘जागरण-गोंधळ’ देखील उत्साहात पार पडला.
-
निखिल आणि अनुष्काची पहिली भेट झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’च्या सेटवर झाली होती.
-
या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सुरुवातीला त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
-
आता हे रील लाईफ कपल रिअल लाईफमध्येही एकमेकांचे जोडीदार झाले असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निखिल चव्हाण/इन्स्टाग्राम)
SC on Shiv Sena Symbol Hearing LIVE: ‘आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात’, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, सुनावणीचे लाइव्ह अपडेट्स