-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) आणि अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) याच वर्षी मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकले.
-
लग्नानंतर हे क्युट कपल सध्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) आपला सफरनामा एन्जॉय करत आहे.
-
अक्षया आणि विशालने त्यांच्या या सुंदर ट्रिपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश वन पीस ड्रेस परिधान केला असून दोघांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
-
हे फोटो शेअर करताना अक्षयाने त्याला ‘Special’ असे कॅप्शन दिले आहे.
-
भारताच्या दक्षिणेला असलेला श्रीलंका हा एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य बेटांचा देश आहे.
-
सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार चहाचे मळे, समृद्ध इतिहास आणि रामायणाशी जोडलेली ऐतिहासिक ठिकाणे यामुळे पर्यटकांसाठी श्रीलंका हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “थोडा उशीर पण पानमसाला जाहिरात प्रकरणी कारवाई होणारच, सेलिब्रिटींना १० लाखांचा दंड…”