-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकतेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पती समीर वानखेडे यांच्यासोबतच्या एका खास ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे कोईम्बतूर येथील प्रसिद्ध ‘श्री मरुधमलई मंदिरा’ला (Shri Maruthamalai Temple) भेट देताना दिसत आहेत.
-
या खास भेटीदरम्यान क्रांतीने जांभळ्या रंगाचा अतिशय सुंदर पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे.
-
या फोटोंना कॅप्शन देताना क्रांतीने लिहिले आहे की, ‘श्री मरुथुमलाई मंदिर (कोइम्बतूर) आणि सर्व दैवी शक्तींच्या आशीर्वादाने आम्हाला मनातून अत्यंत शांत, प्रसन्न आणि समृद्ध असल्यासारखे वाटत आहे. जेव्हा आपली माणसं सोबत असतात, तेव्हा हे जग खूप सुंदर वाटतं.’
-
समीर वानखेडे यांच्या बदलीचा संदर्भ देत तिने लिहिले की, ‘समीरच्या दक्षिण भारतातील पोस्टिंगचा (बदलीचा) हा एक मोठा फायदाच आहे, ज्यामुळे आम्हाला या भव्य मंदिरांना भेट देण्याची आणि अतुल्य भारत अनुभवण्याची संधी मिळत आहे.’
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा प्रचंड वर्षाव होत असून, या जोडीचे खूप कौतुक केले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)
SC on Shiv Sena Symbol Hearing LIVE: ‘आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात’, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, सुनावणीचे लाइव्ह अपडेट्स