-
मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ जून रोजी या दोन्ही कलाकारांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
-
लग्नाच्या दिवशी या जोडीचा पेहराव अत्यंत आकर्षक आणि राजेशाही थाटाचा होता.
-
नववधू अनुष्काने परिधान केलेला सोनेरी रंगाचा डिझायनर लेहंगा तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत होता, तर नवरदेव निखिलने चंदेरी रंगाची नक्षीदार शेरवानी आणि डोक्यावर फेटा बांधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीदेखील विवाहस्थळी पोहोचून या नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला.
-
त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीदेखील विवाहस्थळी पोहोचून या नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद दिला.
-
मुख्य विवाह विधी संपन्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
-
(सर्व फोटो सौजन्य: धैर्यशील मोहिते पाटील /इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”