-
लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
-
अलीकडेच ती हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती महाविद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.
-
वाढदिवसाचे औचित्य साधत प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये ती काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीप्स असलेल्या टी-शर्टमध्ये खूप आनंदी दिसत आहे.
-
तिच्या पाठीमागे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे मोठे गोल्डन रंगाचे फुगे दिसत आहेत. तसेच तिच्या समोर वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांचे आकर्षक बुके ठेवलेले पाहायला मिळत आहेत.
-
प्राजक्ताने आता वयाचा नवा टप्पा गाठला असून ती ३३ वर्षांची झाली आहे. तिने शेअर केलेल्या या सुंदर फोटोंना सोशल मीडियावर ‘३३’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
पुढे तिने सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानत ‘Thank you for all your cute wishes yaar’ असे लिहिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?