-
भारतीय संस्कृतीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत अत्यंत श्रद्धेने साजरे करतात.
-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिनेदेखील यंदाची वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.
-
रेश्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वटपौर्णिमा पूजेचे काही खास आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्मा घरच्या घरी एका छोट्या वडाच्या रोपट्याची मनोभावे पूजा करताना आणि त्याला सुताचे वेढे देताना दिसत आहे.
-
या खास प्रसंगी रेश्माने परिधान केलेली गडद गुलाबी (राणी पिंक) रंगाची साडी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे.
-
नथ, गळ्यात मंगळसूत्र, सोन्याचे दागिने व हिरवा चुडा घालून तिने हा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करत रेश्माने ‘प्रत्येक जन्मी तुझीच साथ लाभो, हीच आजच्या वटपौर्णिमेची मनापासून प्रार्थना’, आशी कॅप्शन लिहिली आहे.
-
सध्या रेश्मा शिंदे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेत ‘जानकी’ ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ