-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकरने (Akshaya Hindalkar) काल लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.
-
१० फेब्रुवारी २०२६ रोजी अक्षया अभिनेता विशाल निकमबरोबर (Vishal Nikam) लग्नबंधनात अडकली.
-
पहिल्या वटपौर्णिमेसाठी (Vat Purnima 2026) अक्षयाने जांभळ्या रंगाची चेक्स इरकल साडी नेसली होती.
-
विशालनेही अक्षयाला मॅचिंग असा जांभळ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला होता.
-
या दिवशी वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
-
पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या वटपौर्णिमा या सणाचे विशेष महत्त्व आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत अक्षयाने, “सण एक निमित्त, आपुलकी खरी, तुझ्या स्पर्शात मिळते आयुष्याची श्री… काही मागणं नाही, काही अपेक्षा नाही, तू सोबत असणं… हेच माझं सर्व काही…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत