-
पावसाळा सुरू होताच सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे घरगुती उपाय नक्की करून पहा..
-
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-कफापासून आराम मिळतो.
-
आले, तुळशीची पाने, काळी मिरी आणि गूळ घालून बनवलेला काढा प्या. पावसाळी आजारांवर हा एक उत्तम आणि झटपट उपाय आहे.
-
रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची पाने खाल्ल्याने किंवा तुळशीचा चहा प्यायल्याने व्हायरल इन्फेक्शनचा धोका टळतो.
-
जंतूंशी लढण्यासाठी आहारात लिंबू पाणी, आवळा किंवा संत्री यांसारख्या व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळांचा समावेश करा.
-
पावसाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी नेहमी पाणी उकळून किंवा कोमट करून प्या.
-
पावसाळ्यात रोज कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रियाही सुधारते.
-
पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील अन्न खाणे टाळा आणि शरीराबरोबरच घराचीही स्वच्छता राखा.
“अजितमामांबद्दल स्वर्गीय हा शब्द कानांना, हृदयाला खटकतो” आठवणी सांगताना भाची दिप्ती घाटगेंच्या डोळ्यांत पाणी