-
निसर्गाचा अनमोल ठेवा
आयुर्वेदानुसार कडुलिंब ही भारतातील सर्वात मौल्यवान औषधी वनस्पती असून, याला पारंपरिक उपचारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. -
ग्रामीण भागातील हक्काचे रुग्णालय
कडुलिंबाच्या अफाट औषधी गुणांमुळे या झाडाला ग्रामीण भागातील फिरते रुग्णालय म्हणून ओळखले जाते. -
झाडाचा प्रत्येक भाग गुणकारी
या बहुगुणी झाडाची पाने, सालं, फुले, फळे, बिया आणि तेल या सर्वच गोष्टींचा वापर औषधनिर्मितीत होतो. -
त्वचेच्या विकारांवर उत्तम पर्याय
त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आणि विविध आजार दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचा रस अत्यंत गुणकारी ठरतो. -
सौंदर्यप्रसाधनांमध्ये वाढता वापर
या वनस्पतीमधील शुद्धीकरण घटकांमुळे साबण, फेसपॅक आणि विविध क्रीम्समध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. -
दंत आरोग्याची उत्तम राखण
पिढ्यानपिढ्या कडुलिंबाच्या काड्यांचा वापर दात घासण्यासाठी आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी केला जात आहे. -
आधुनिक टूथपेस्टमध्ये महत्त्वाचे स्थान
आजकालच्या आधुनिक टूथपेस्ट आणि माऊथवॉशमध्ये दातांच्या मजबुतीसाठी कडुलिंबाचा अर्क आवर्जून वापरतात. -
शेती व्यवसायासाठी मार्गदर्शक
कडुलिंबाचा उपयोग पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी होतो. -
उत्कृष्ट नैसर्गिक कीटकनाशक
या झाडाच्या बियांपासून बनवलेली उत्पादने शेतात नैसर्गिक कीटकनाशक म्हणून पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करतात. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया