-
मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) आपल्या उत्कृष्ट अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
नुकतेच ईशाने एका सुंदर पारंपारिक लूकमध्ये खास फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
या फोटोशूटसाठी ईशाने हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे, जी तिने लेहेंगा पद्धतीने नेसली आहे.
-
लाल रंगाचा पफ स्लीव्ह्ज ब्लाउज आणि हिरव्या साडीचे हे कॉम्बिनेशन तिच्यावर खूपच उठून दिसत आहे.
-
या मराठमोळ्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी ईशाने गळ्यात मोत्यांचा सुंदर हार, हातात सोन्याच्या बांगड्या आणि लाल रंगाचा चुडा परिधान केला आहे.
-
कपाळावर छोटी चंद्रकोर लाल टिकली, नाकात नाजूक नथ आणि चेहऱ्यावर अगदी हलका मेकअप करत ईशाने हा लूक पूर्ण केला आहे.
-
तसेच केसांचा आंबाडा बांधून त्यावर पांढरा गजरा माळल्यामुळे ईशाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा केसकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत