-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सध्या ‘शंकर जयकिशन’ (Shankar Jaykishan Marathi Natak) या नाटकामुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
या नाटकात शिवानीबरोबर भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांसारखे दिग्गज अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत.
-
‘भरत जाधव एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे दर्जेदार लेखन विराजस कुलकर्णीने केले आहे.
-
विनोद, भावना आणि नातेसंबंधांची सुंदर वीण गुंफणारे हे एक कौटुंबिक नाटक आहे.
-
दरम्यान, शिवानीने नुकतेच पावसाळ्याचे स्वागत करत एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने निळ्या रंगाचा स्टायलिश कॉटन जॅकेट को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
शिवानीने हे सुंदर फोटो शेअर करत त्याला ‘Happy Rainy Colours!’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
सोनम वांगचुक यांची पोस्ट चर्चेत; “मी उपोषण सोडायला तयार पण माझ्या या तीन अटी मान्य कराव्यात”