-
दिवसभराची धावपळ, ताणतणाव व अयोग्य दिनचर्या यांचा थेट परिणाम आपली झोप आणि पचनसंस्था यांवर होत असतो.
-
रात्रीचे जेवण हलके असावे, ज्यामुळे पोट साफ राहील आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटेल.
-
दलिया
गव्हाची भरड (Cracked Wheat)
दळून तयार केलेला पदार्थ म्हणजे दलिया. फायबर भरपूर असलेला हा पदार्थ भाज्यांसोबत खाल्ल्याने रात्री भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. -
इडली
फर्मेन्टेड असलेली इडली पचायला अतिशय हलकी असते. रात्री सांबार-चटणीसोबत हा एक उत्तम आहार ठरतो. -
खिचडी
तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी पोटावर अजिबात ताण पडू देत नाही, तसेच तूप किंवा दह्यासोबत ती अधिक पौष्टिक बनते. -
दुधी भोपळा
पाण्याचे प्रमाण जास्त आणि उष्मांक कमी असलेली फळभाजी म्हणजे दुधी भोपळा. रात्रीच्या वेळी त्याचे सूप किंवा भाजी शरीराला हायड्रेट ठेवते. -
मूग डाळ
पचायला सर्वांत सोपी असलेली मूग डाळ रात्री भात किंवा चपातीसोबत खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. -
पनीर
रात्रीच्या जेवणात कमी मसाल्यांचे ग्रील्ड पनीर खाल्ल्याने शरीराला रात्रभर प्रथिनांचा पुरवठा होतो आणि स्नायू मजबूत होतात. -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा