-
‘प्रेमाची गोष्ट’फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
स्वरदा आणि तिचा पती सिद्धार्थ राऊत लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
अभिनेत्रीने नुकतेच तिचे सुंदर मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये स्वरदा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप अतिशय सुंदर पद्धतीने फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
एका खास फोटोत सिद्धार्थने तिला पाठीमागून मिठी मारली असून, दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
-
समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर ‘MOM DAD’ असे लिहिले असून, त्यांनी एकमेकांचा हात धरले आहेत.
-
सिद्धार्थ गुडघ्यावर बसून स्वरदाच्या बेबी बंपला लाडाने किस करताना दिसत आहे.
-
स्वरदाने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या सोशल मीडियावरून या जोडप्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?