-
‘शुभ श्रावणी’ ही नवीन मराठी मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत मुख्य अभिनेत्री वल्लरी विराज ‘श्रावणी’ ही अतिशय सुंदर भूमिका साकारत आहे.
-
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या वल्लरीने नुकतेच आपले काही नवीन आणि मनमोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
वल्लरी एका अतिशय सुंदर आणि मॉडर्न वन-पीस ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
-
वल्लरीने या सुंदर ड्रेससोबत मॅचिंग ब्राऊन रंगाचे हिल्स घातले असून ती कॅमेऱ्यासमोर छान पोझ देताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने केसांना छान पोनीटेल बांधली असून, कानातील आणि हातातील कड्यामुळे तिचा हा साधा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
वल्लरीचा हा हलका मेकअप, चेहऱ्यावरील गोड हसू आणि हा फ्रेश कॅज्युअल लूक चाहत्यांना प्रचंड आकर्षित करत आहे.
-
तिच्या या हटके फॅशन सेन्सचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ