-
पावसाळा सुरू झाला की गरमागरम, कुरकुरीत भजी आणि सोबत चहा म्हणजे अगदी स्वर्गसुख! पण कधीकधी भजी मऊ पडतात किंवा जास्त तेलकट होतात. तसे होऊ नये म्हणून भजी बनवताना या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा..
-
बेसन पिठात १ ते २ चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करा. यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ मऊ पडत नाहीत.
-
पीठ भिजवताना त्यात १ चमचा कडकडीत गरम तेल (मोहन) घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. यामुळे भजी छान खुसखुशीत होतात.
-
भज्यांचे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असू नये. पीठ जास्त पातळ झाले तर भजी तेल शोषून घेतात आणि जास्त घट्ट झाले तर आतून कच्ची राहतात.
-
बेसनाचे पदार्थ पचायला थोडे जड असतात. त्यामुळे पिठात हाताने चोळून थोडा ओवा आणि चिमूटभर हिंग नक्की टाका. यामुळे भज्यांना चवही छान येते.
-
भज्यांमध्ये जास्त बेकिंग सोडा घालू नका. सोड्यामुळे भजी फुगतात खरी, पण ती खूप जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात.
-
भजी तळताना तेल व्यवस्थित गरम झालेले असावे. तेल कमी गरम असेल तर भजी तेलकट होतात, आणि खूप जास्त कडकडीत गरम असेल तर भजी वरून लगेच लाल होतात पण आतून कच्ची राहतात.
-
भजी तेलात सोडल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवा. यामुळे भजी आतून छान शिजतात आणि मस्त कुरकुरीत होतात.
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…