-
आसामी खाद्यसंस्कृती म्हणजे ताजे घटक, नाजूक स्वाद आणि समृद्ध वारसा! चटकदार माशांच्या करीपासून ते सणासुदीच्या ‘पिठा’पर्यंत, या राज्याची चव मनाला भुरळ पाडणारी आहे. आसामच्या खाद्यसंस्कृतीची सफर करायची असेल, तर हे ६ पारंपरिक पदार्थ नक्की ट्राय करा! (सर्व फोटो – विकिमीडिया कॉमन्स)
-
बदकाच्या मांसाची करी : बिहू आणि विशेष प्रसंगी बनवला जाणारा सणासुदीचा पदार्थ! बदकाचे मांस पांढरा कोहळा, तीळ किंवा मोसमी भाज्यांसोबत संथ आचेवर शिजवले जाते, ज्यामुळे याला एक सुगंधी आणि रिच स्वाद येतो.
-
खार : खारशिवाय आसामी जेवण अपूर्णच! उन्हात वाळवलेल्या केळीच्या सालीच्या राखेतून काढलेल्या विशेष अल्कधर्मी पाण्याचा वापर करून हा पदार्थ बनवला जातो. हा आसामचा सर्वात युनिक पदार्थ आहे.
-
मासोर टेंगा : उन्हाळ्यातील लोकप्रिय, हलकी आणि आंबट चवीची माशाची करी! ताजे मासे, टोमॅटो, लिंबू किंवा स्थानिक आंबट फळांपासून बनवलेली ही करी वाफाळलेल्या गरम भातासोबत अप्रतिम लागते.
-
दोई-चिरा : बिहू सणाचा आवडता आणि पारंपरिक नाश्ता! मऊ पोहे, घट्ट दही, ताजी मलई (क्रीम) आणि गूळ एकत्र करून बनवलेला हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि ताजेतवाने करणारा आहे.
-
तीळ पिठा: आसामचा प्रसिद्ध गोड पदार्थ! चिकट तांदळाच्या (Sticky Rice) पापुद्र्यामध्ये भाजलेले तीळ आणि गूळ यांचे खमंग सारण भरून हे रोल्स बनवले जातात. संध्याकाळच्या चहासाठी हा परफेक्ट बेत आहे.
-
आलू पिटिका: आसामी लोकांचे ऑल-टाइम फेव्हरेट ‘कम्फर्ट फूड’! उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कच्चे मोहरीचे तेल, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून बनवलेला हा एक साधा पण चवदार पदार्थ आहे.
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ