-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या ती सोशल मीडियावर तिच्या एका नव्या पारंपरिक साडीतील फोटोशूटमुळे कमालीची चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने परिधान केलेली लाल रंगाची नऊवारी साडी अगदी जुन्या काळातील वैभवशाली साड्यांची आठवण करून देते.
-
गळ्यात कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, नाकात पारंपरिक नथ आणि कपाळावर चंद्रकोर, असे तिचे हे मनमोहक रूप लक्ष वेधून घेत आहे.
-
विशेषतः तिने डोक्याला बांधलेल्या मुंडवळ्यांमुळे तिच्या या सावळ्या आणि सुंदर लूकची सर्वत्र प्रचंड चर्चा होत आहे.
-
पार्श्वभूमीला असलेली विटांची भिंत आणि कौलारू छप्पर यांमुळे हे फोटोशूट गावरान वातावरणात केल्याचे स्पष्ट जाणवते.
-
या संपूर्ण पेहरावात ती अगदी नववधूसारखी दिसत असून, तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर पसंतीचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वार्या शेटे/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ