-
त्वचेच्या आरोग्यासाठी टॉवेल आणि बेडशीट वेळेवर धुणे अत्यंत आवश्यक आहे. कारण- त्यावरील जीवाणूंमुळे संसर्ग होऊ शकतो आणि पुरळ येऊ शकतात. (फोटो सौजन्य : AI)
-
अंघोळीचे टॉवेल दोन ते तीन वेळा वापरल्यानंतर लगेच धुतले पाहिजे. कारण- बाथरूममधील ओलसर हवेमुळे त्यात बुरशी वाढू शकते. (फोटो सौजन्य : AI)
-
चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने चेहरा पुसण्याचा रुमाल (फेस टॉवेल) आणि अंघोळीचा लहान रुमाल (वॉशक्लॉथ) एक-दोनदा वापरल्यानंतर स्वच्छ धुणे किंवा बदलणे गरजेचे आहे.
(फोटो सौजन्य : AI) -
जिम आणि स्विमिंग पूलमध्ये वापरलेले टॉवेल संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक वेळी वापरल्यानंतर न विसरता, धुतले पाहिजेत. (फोटो सौजन्य : AI)
-
बेडशीट आठवड्यातून एकदा बदलणे उत्तम मानले जाते; परंतु ॲलर्जी किंवा जास्त घाम येत असल्यास ती त्याआधीच धुवावी. (फोटो सौजन्य : AI)
-
उशांची कव्हरे थेट चेहऱ्याच्या संपर्कात येत असल्याने ती दर तीन ते चार दिवसांनी बदलणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : AI)
-
रात्री अंघोळ करून झोपल्याने आणि सकाळी उठल्यावर काही वेळ बेडशीट खुली ठेवल्याने ती जास्त काळ स्वच्छ राहते. (फोटो सौजन्य : AI)
-
टॉवेल आणि बेडशीट नियमित धुतल्याने जीवाणू आणि अतिसूक्ष्म कीटक नष्ट होऊन त्वचा आणि आरोग्य दोन्ही उत्तम राहते. (फोटो सौजन्य : AI)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : AI)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…