-
आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत अवेळी खाणे आणि जंक फूडमुळे अनेकांना पोट फुगणे (Bloating) आणि गॅसचा त्रास होतो.
-
औषधांऐवजी या पाच नैसर्गिक घरगुती उपायांचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही तुमचे पोटाचे आरोग्य आणि पचनशक्ती उत्तम ठेवू शकता.
-
ताक (Chaas)
जेवणानंतर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि यातील प्रो-बायोटिक्समुळे पोटदुखी, तसेच आयबीएसच्या त्रासापासून आराम मिळतो. -
ओवा (Ajwain)
ओव्यामध्ये असणारे थायमॉल हे घटक पाचक रसांना सक्रिय करतात, ज्यामुळे तेलकट जेवणानंतर होणारा अपचनाचा त्रास मिनिटांत दूर होतो. -
हिंग (Hing)
हिंगामधील गॅसरोधक गुणधर्मांमुळे पोटात अडकलेली हवा बाहेर पडते आणि फंक्शनल डिस्पेप्सियासारख्या गंभीर पोटाच्या आजारांवर आराम मिळतो. -
बडीशेप (Saunf)
जेवणानंतर बडीशेप चघळल्याने किंवा तिचा चहा प्यायल्याने त्यातील नैसर्गिक तेलांमुळे पचनसंस्थेचे स्नायू शांत होतात आणि गॅस सहज साफ होतो. -
शहाजिरा (Kala Jeera)
सकाळी रिकाम्या पोटी शहाजिऱ्याचे उकळलेले पाणी प्यायल्याने पित्ताचे प्रमाण नियंत्रित राहते आणि गॅस्ट्रायटिस, तसेच उलट्यांचा त्रास कमी होतो. -
आपल्या घरातील स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले हे साधे मसाले म्हणजे पोटाचे आरोग्य जपण्यासाठी आयुर्वेदाने दिलेले वरदानच आहे.
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
“पुरीसाहेब एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते”, स्वाती चिटणीस यांनी सांगितली अमरीश पुरी यांची आठवण