-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.
-
श्रुतीने केवळ मराठीतच नव्हे, तर तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपट-मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
आता श्रुती लवकरच ‘प्रितम अँड पेड्रो’ (Pritam and Pedro) या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नुकताच या वेब सीरिजचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला.
-
या खास सोहळ्यासाठी श्रुतीने परिधान केलेल्या आकाशी रंगाच्या फ्लोरल प्रिंट ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही एक आगामी कॉमेडी-ड्रामा वेब सीरिज आहे.
-
या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी सांभाळली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
“…अर्पिता मला घटस्फोट देऊ शकते”; आयुष शर्माचं वक्तव्य, म्हणाला, “सलीम खान यांना आजपर्यंत…”