-
मराठी चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रचंड गाजलेल्या मालिकेतील ‘शनाया’ या भूमिकेमुळे रसिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
आता रसिका ‘जीडीएन’ या बहुप्रतीक्षित दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आर. माधवन याची मुख्य भूमिका असलेल्या ‘जीडीएन’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला.
-
रसिकाने या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची सुंदर बांधणी साडी नेसली होती.
-
या बांधणी साडीवर रसिकाने परिधान केलेला व्ही नेक डिझाईनचा ब्लाऊज तिच्या लूकला बोल्ड टच देत होता.
-
रसिकाच्या या साडीतील लूकवर फिदा झालेल्या चाहत्यांनी तिला थेट ‘न्यू नॅशनल क्रश’ अशी नवी उपमा दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
‘आम्हालाच फाशी दिली जातेय’, FDA च्या कारवाईनंतर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची संतप्त प्रतिक्रिया