-
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं नुकतंच लग्न झालं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेशन सेंटरमध्ये अत्यंत थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात हे लग्न पार पडलं. (Photo – Revati Sule/Instagram)
-
तर, आता दोन दिवसांपूर्वी पुण्यात रिसेप्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Photo – Revati Sule/Instagram)
-
यासाठी रेवती सुळेने केलेल्या लुकची सर्वत्र चर्चा झाली. (Photo – makeupbyareeshaa/Instagram)
-
अत्यंत साध्या आणि सोबर लूकमुळे तिचा लूक चर्चेत होता. (Photo – makeupbyareeshaa/Instagram)
-
पिवळ्या रंगाची पैठणी तिने परिधान केली होती. (Photo – Revati Sule/Instagram)
-
यावर ठुशी, तीन-चार पदरांची माळ( याला गहुमाळ असंही म्हणतात) आणि नाजूकसं मंगळसुत्र तिने परिधान केलं होतं. (Photo – makeupbyareeshaa/Instagram)
-
हेअरस्टाइलही अत्यंत सुंदर ठेवली होती. केसांचा आंबेडा बांधून त्यावर मोगऱ्याचा गजरा तिने माळला होता. (Photo – Revati Sule/Instagram)
-
नववधुच्या हातात हिरवा चुडाही शोभून दिसत होता. तिच्या या लूकची आता सर्वत्र चर्चा होत असून, तिने नववधूच्या फॅशनचा एक नवा पायंडा पाडला आहे. (Photo – Revati Sule/Instagram)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”