-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून मनोरंजक वळणावर आली आहे.
-
मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
याच मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री जाई खांडेकर हिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
जाईने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर अशा गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत आणि पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
-
एका फोटोमध्ये जाईच्या डोक्याला पांढरी पट्टी बांधलेली असून तिच्या चेहऱ्यावर मार लागल्याचे दिसत आहे, ज्यामुळे कथानकातील रंजकतेचा अंदाज येतो.
-
या विशेष फोटोंमध्ये तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री मुग्धा शाह या देखील एका वेगळ्या अंदाजात एकत्र बसलेल्या दिसत आहेत.
-
अभिनेत्री मुग्धा शाह या ‘आनंदी’ मालिकेत एक नकारात्मक भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारत आहेत.
-
पडद्यामागील कलाकारांचे हे निखळ नाते आणि त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जाई खांडेकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत