-
बिळांमध्ये पाणी भरल्यामुळे साप सुरक्षित जागेच्या शोधात जंगलांमधून गावे आणि घरांच्या आसपास आश्रयाला येत आहेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
भारतात सापांच्या ३०० हून अधिक प्रजाती असून, रसेल वायपर, सॉ-स्केल्ड वायपर, नाग (कोब्रा) आणि मण्यार (करैत) या ‘बिग फोर’ सापांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
भारतीय नाग (इंडियन कोब्रा)
भारतात सर्वाधिक आढळणाऱ्या आणि ६ फुटांपर्यंत लांबी असणाऱ्या या सापाचे ‘न्यूरोटॉक्सिक’ विष थेट मानवी मज्जासंस्थेवर हल्ला करते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
मण्यार (इंडियन करैत)
रात्रीच्या वेळी अत्यंत सक्रिय असणारा हा काळ्या-किरमिजी रंगाचा साप गावांमधे आढळतो आणि याचे विषही मज्जासंस्थेला वेगाने निकामी करते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
घोणस (रसेल वायपर)
हल्ला करण्यापूर्वी कुकरच्या शिट्टीसारखा मोठा आवाज काढणाऱ्या या सापाचे ‘हेमोटॉक्सिक’ विष मानवी रक्तवाहिन्या आणि किडनीचे गंभीर नुकसान करते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
फुरसे (सॉ-स्केल्ड वायपर)
आकाराने लहान पण अत्यंत विषारी असणारा हा साप प्रामुख्याने वाळवंटी व खडकाळ भागात आढळतो आणि याच्या विषाने शरीरात अंतर्गत रक्तस्राव होतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
किंग कोब्रा (नागराज)
जगातील सर्वांत लांब (१८ फुटांपर्यंत) असणारा हा साप घनदाट जंगलात आढळतो आणि याचे विष श्वसनसंस्था बंद पाडण्यास कारणीभूत ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
सापांपासून बचावासाठी घराभोवती स्वच्छता ठेवावी, कचऱ्याचे ढीग साचू देऊ नयेत आणि रात्री बाहेर पडताना नेहमी टॉर्चचा वापर करावा. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
साप दिसल्यास त्याला मारू नये, तात्काळ सर्पमित्राशी संपर्क साधावा आणि सर्पदंश झाल्यास कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता त्वरित रुग्णालयात जावे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”