-
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री तिच्या अभिनय आणि सौंदर्याने नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आली आहे.
-
अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुख याच्या बहुप्रतीक्षित राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटात भाग्यश्री राजमाता जिजाऊंची अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
या ऐतिहासिक भूमिकेमुळे भाग्यश्री सध्या प्रचंड चर्चेत असून, तिची ही नवीन इनिंग पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.
-
नुकतेच भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पारंपरिक साडीतील तिचे काही अप्रतिम फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने निळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेडमधील जरीकाठाची एक सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे.
-
तिने गळ्यात काहीही न घालता, केवळ कानात मोठे सोन्याचे झुमके, हातात तोडे व अंगठी असा मर्यादित, पण अतिशय राजेशाही दागिना कॅरी केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना भाग्यश्रीने सोशल मीडियावर ‘तसव्वुर की तस्वीर’ (Tasavvur ki tasvee) अशी एक सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
भाग्यश्रीचे सौंदर्य आणि साधेपणा दाखवणारे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा