-
राधा सागर (Radha Sagar) ही मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आषाढी वारीच्या निमित्ताने राधाने नुकतेच पुण्यात माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले.
-
यंदा ७ जुलैपासून आषाढी वारीला सुरुवात झाली असून, या पालखी सोहळ्यातील काही खास फोटो राधाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना राधाने “पालखीची वाट, भक्तीची साथ, विठुरायाचा आशीर्वाद” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
पुण्यात असताना राधाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचेही दर्शन घेतले.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही सामान्य वारकऱ्यांसहच अनेक मराठी सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावाने वारीत सहभागी झाले आहेत.
-
दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)
सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? सकाळी की रात्री? तज्ज्ञ सांगतात, “बहुतांश जोडपी शरीरसंबंधासाठी ‘ही’ सर्वांत वाईट वेळच निवडतात…”