-
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) सध्या एका कामानिमित्त मॉरिशसमध्ये आहेत.
-
अथांग निळाशार समुद्र, पांढऱ्या वाळूची किनारपट्टी आणि सुंदर लगून्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मॉरिशसच्या (Mauritius) समुद्रकिनारी या दोघींनी नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
-
विशेष म्हणजे, या फोटोशूटसाठी दोघींनीही साडीची निवड केली आहे.
-
या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी गुलाबी रंगाची चेक्स कॉटन इरकल साडी नेसली आहे, तर तितीक्षा निळ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये खुलून दिसत आहे.
-
ऐश्वर्या आणि तितीक्षा या केवळ उत्तम अभिनेत्रीच नाहीत, तर त्या व्यावसायिक भागीदारही आहेत.
-
त्यांचा साड्यांचा स्वतःचा एक ब्रँडअसून, याच व्यवसायाच्या प्रदर्शनासाठी त्या मॉरिशसला गेल्या आहेत.
-
विशेष म्हणजे, त्यांच्या या व्यवसायात अभिनेत्री सुरुची अडारकरदेखील त्यांची पार्टनर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा