-
महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) सोशल मीडियावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
कार्तिकीने आळंदीत उपस्थित राहून माउलींच्या पालखी प्रस्थानाचे मनोभावे दर्शन घेतले आणि या सोहळ्याचे विलोभनीय क्षण आपल्या चाहत्यांसह शेअर केले.
-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी (८ जुलै) पहाटे चार वाजता घंटानादाने उत्साहात प्रारंभ झाला.
-
पहाटेच्या सत्रात काकडा आरती, पवमान अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा आणि दुधारती असे धार्मिक विधी पार पडले.
-
त्यानंतर माउलींच्या समाधीवर विलोभनीय मुखवटा ठेवून तुळशीहार व गुलाबपुष्पांचा हार अर्पण करण्यात आला.
-
सायंकाळी ठीक ६ वाजून २० मिनिटांनी माउलींच्या पालखीने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
-
यावेळी ‘ज्ञानोबा-माउली-तुकाराम’च्या जयघोषाने आणि विणा-टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण आळंदी परिसर भक्तिमय झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : अभिनेत्री राधा सागरने पुण्यात घेतले माउलींच्या पालखीचे दर्शन; म्हणाली, ‘विठुरायाचा आशीर्वाद…’)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”