-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही नुकतीच अभिनेता विशाल निकमसोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकली आहे.
-
लग्नानंतर हे लाडकं जोडपं आपल्या सुट्यांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी निसर्गरम्य श्रीलंका येथे गेलं आहे.
-
श्रीलंकेच्या या सुंदर सफरीदरम्यानचे काही खास फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा एक अतिशय सुंदर आणि शॉर्ट वनपीस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अक्षया कधी रेल्वेच्या दारात उभी राहून, तर कधी रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहत पोज देताना दिसतेय.
-
काही फोटोंमध्ये ती श्रीलंकेच्या हिरव्यागार चहाच्या मळ्यांमध्ये आणि रंगीबेरंगी फुलांच्या बागेत फिरताना आनंद व्यक्त करीत आहे.
-
हे मनमोहक फोटो शेअर करीत तिने ‘Tere khayalo ki mallika’ अशी रोमँटिक कॅप्शनदेखील दिली आहे.
-
निसर्गाच्या सान्निध्यात काढलेले अक्षयाचे हे अत्यंत क्यूट आणि फ्रेश फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक