-
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आपल्या अभिनयाबरोबरच साधेपणासाठी आणि मातीशी असलेल्या नात्यासाठी ओळखले जातात.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ फेम लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
अश्विनी सध्या तिच्या गावी पारंपरिक पद्धतीने हळदीची शेती करत असून, तिचे शेतातील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
हळद हे महाराष्ट्रातील खरिपाचे एक मुख्य आणि महत्त्वाचे पीक मानले जाते. अलिकडच्या वर्षांत या मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
-
अशातच, अश्विनीने थेट शेतात उतरून हळद लागवडीची कामे करतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तिने लिहिलेले कॅप्शन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अश्विनीने लिहिले, “ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ पडो.. त्या त्या वेळी शेतकरी शून्यातून जग उभं करतो. तेच संस्कार वडिलांनी केले. शेतकरी कधीच खचत नसतो…”
-
अश्विनीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. “अभिनयाबरोबरच मातीशी नातं जपणारी अभिनेत्री,” अशा शब्दांत चाहत्यांनी तिच्या कष्टाचे आणि तिच्यावर झालेल्या संस्कारांचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा