-
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या ती एका खास कामानिमित्त निसर्गरम्य अशा मॉरिशस देशात गेली आहे.
-
तिने तिथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काढलेले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेली सुबक आणि देखणी हिरव्या रंगाची साडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
-
या साडीसोबत तिने मॅचिंग डिझायनर ब्लाऊज परिधान केला असून तिचा हा पारंपरिक लूक अत्यंत खुलून दिसतोय.
-
समुद्रकिनाऱ्यावरील मंद वाऱ्यावर उडणारा तिच्या साडीचा पदर तिच्या या फोटोंना एक वेगळाच ग्लॅमरस लूक देतोय.
-
तिच्या या नॅचरल आणि मनमोहक लूकवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
नेटकऱ्यांकडून सध्या तितीक्षाच्या या साडीतील लूकचे आणि तिच्या फोटोजनिक पोझेसचे खूप कौतुक केले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा