-
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या स्वप्नसुंदरी या बहुप्रतिष्ठित आणि बहुचर्चित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा रोमँटिक चित्रपट २४ जुलै रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
या चित्रपटात मुख्य भूमिकेत चॉकलेट बॉय भूषण प्रधान आणि गुणी अभिनेत्री सायली पाटील यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.
-
भूषण आणि सायली पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करीत आहेत. नुकतेच या दोघांचे काही सुंदर आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
-
या फोटोंमध्ये भूषण आणि सायली दोघांनीही पांढऱ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान करून एकमेकांचे हात धरलेले दिसत आहेत.
-
एका फोटोत सायलीने भूषणच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने डोके ठेवले असून, तिच्या हातात एक लाल गुलाब दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोत ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना खूपच मनमोहक दिसत आहेत.
-
त्यांची ही ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री आणि साधेपणा चाहत्यांना प्रचंड आवडत असून, हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सायली पाटील/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा